Devendra Fadanvis : कसबा मतदानापूर्वी फडणवीसांचं ब्राह्मण समाजाबाबत मोठं विधान; म्हणाले, ब्राह्मण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : कसबा मतदानापूर्वी फडणवीसांचं ब्राह्मण समाजाबाबत मोठं विधान; म्हणाले, ब्राह्मण...

Devendra Fadanvis : ब्राह्मण समाज काही मागत नाही हेच त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते.

मागणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे असेही ते म्हणाले. ब्राह्मण मंडळी समाजामध्ये सारखेचा गोडवा निर्माण करतात असेही विधान फडणवीस यांनी केले आहे. कसबा मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना फडणवीसांनी हे विधान केल्याने याचा काही परिणाम मतांवर होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

फडणवीस म्हणाले की, मी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो आहे. अनेक प्रकारच्या संघटना काम करतात. मात्र, या सर्वामध्ये ब्राह्मण संघटनांमध्ये पाहण्यास मिळाली आणि ती म्हणजे या संघटनांची कोणतीच मागणी नसते.

ब्राह्मण समाजाने नेहमीच समाजाला देण्याचे काम केले आहे. आम्ही केवळ देण्याचे काम करतो. ही जी देण्याची परंपरा आहे कायम ठेवत मागण्याऐवजी देणारे कसे बनावे याबाबत येणाऱ्या पिढीला तयार करणे गरजेच आहे, आणि हीच ब्रह्मोद्योगची अपेक्षा असून याच दृष्टीने याची सुरूवात करण्यात आल्याचे ते म्हणाले.

देशात संख्येच्या तुलनेत ब्राह्मण कमी असतील मात्र, ब्राह्माणांमध्ये एक क्षमता असून, समाजरूपी दूधात ब्राह्मणाला मिसळल्यास ते साखरेच्या गोडव्याप्रमाणे काम करतात असे मी नेहमीच म्हणतो असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnaviscaste