नांदणी मठाचा इतिहास हा इ. स. ८५७ पेक्षा पूर्वीचा असून, उपलब्ध कागदपत्रांवरून नांदणी मठाची उत्पत्ती ७०१ पासूनची आहे. या पीठाचे पहिले आचार्य श्री. जिनसेन महाराज हे होते.
सांगली : ‘‘विसाव्या शतकातील जैन धर्माचे (Jainism) पहिले आचार्य चरित्र चक्रवर्ती १०८ श्री शांतिसागर महाराजांचा केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ किताब (Bharat Ratna Award) देऊन गौरव करावा. या किताबाने देशभरातील जैन समाजाला प्रेरणा मिळेल. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होईल. त्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी,’’ अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली.