Nanibai Chikhali Dam Latest News,
esakal
नानीबाई चिखली : वेदगंगा नदीवर असलेला नानीबाई चिखली बंधारा म्हणजे केवळ पाणी अडविणारी संरचना नाही, तर परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेला आधार आहे. बंधारात अडवल्या जाणाऱ्या पाण्यामुळे हजारो हेक्टर शेती ओलिताखाली (Nanibai Chikhali Dam Repair) आली, अनेक गावांची तहान भागत आहे; परंतु शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती आणणारा बंधारा दुरवस्थेने ग्रासला आहे. भविष्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर या बंधाऱ्याची दुरुस्ती आवश्यक आहे.