
सुनील कोंडुसकर
चंदगड : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक शेती अभियान सुरू केले आहे. त्यानुसार चंदगड तालुक्यात जांबरे, बेळेभाट, सुरुते व राजगोळी या चार गावांतून २०० हेक्टरवर हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने शेती कशी कसायची याचे प्रात्यक्षिक घडवले जाणार आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे.