‘आपण जिल्हा परिषद आणि कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढविणार आहोत. त्यामुळे तयारीला लागा. माणसे शोधा, पक्ष संघटन वाढवा’, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर : ‘लोकांची सेवा करा, त्यांना विश्वास द्या आणि आपला पक्ष संघटन वाढवा. जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’चे (NCP) गतवैभव निर्माण करण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये असून, तिचा आता वापर करा. घराघरांत जाऊन सभासद नोंदणी करा’, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif) कार्यकर्त्यांना केले.