'त्या' दोन आमदारांना बाजूला ठेऊन राष्ट्रवादीनं पुढाकार घ्यावा

Ncp
Ncpsakal
Updated on

कोल्हापूर: राष्ट्रवादीने कोल्हापूर शहराची हद्दवाढ केल्यास महापालिकेवर राष्ट्रवादीकडे एकहाती सत्ता येईल. त्यामुळे हद्दवाढीचा मुद्दा आपण उचलला पाहिजे. हद्दवाढीला मित्रपक्षातील दोन आमदार मदत करणार नाहीत, त्यामुळे त्यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीने यामध्ये पुढाकार घ्यावा, तसेच महापालिकेसह जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत मित्रपक्षाला जवळ घेऊ नका. मित्रपक्ष स्वार्थ पाहत आहेत. बाहेरचे कारभारी आणू नका, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक व्ही. बी. पाटील यांनी आज केली.

बाजार समिती येथील शाहू सांस्कृतिक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ होते.

पाटील म्हणाले, ‘‘स्थानिक संस्था निवडणुकीत तरुण आणि पक्षासाठी कार्य करणाऱ्यांना संधी द्यावी. एखादा कार्यकर्ता पराभूत झाला तरी चालेल; पण त्यालाच निवडणुकीत संधी द्यावी. याशिवाय शहर आणि कोल्हापूर उत्तरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होईल अशी भूमिका घेऊ नका. मंत्री मुश्रीफ यांनी यामध्ये पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना बळकटी दिली पाहिजे.’’

आर. के. पोवार म्हणाले, ‘‘पक्षाला २२ वर्षे झाली. पक्षाचे काम खूप चांगले सुरू झाली. संभाजी देवणे यांना उपमहापौर केले. महानगरपालिकेमध्ये मुश्रीफ यांनी १४ ते १५ महापौर, उपमहापौर व पदाधिकारी केले. महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता यावी.’’

Ncp
नवा ट्विस्ट: जयंत पाटलांच्या उजवीकडे सुमनताई तर डावीकडे संजयकाका

महापालिका निवडणुकीमध्ये सर्वांना टार्गेट द्यावे. त्यानुसार काम करूया, असे आवाहन राजेश लाटकर यांनी केले. स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास म्हणाले,‘‘सत्ता उपभोगण्यासाठी नसून समाजसेवेसाठी आहे, हे मुश्रीफ यांनी दाखवून दिले आहे. राष्ट्रवादी पक्षाला आपण बळकटी दिली पाहिजे. महापालिका निवडणूक आली आहे, आता तुम्ही युवकांना संधी द्यावी. अनेक युवक पक्षामध्ये येण्यास तयार आहेत.’’आम्हाला आता महामंडळ मिळाले पाहिजे. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पद द्यावे, अशी मागणीही फरास यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Gokul Election Resolution Controversy kolhapur vinya kore, hasan mushrif, satej patil, prakash abitkar, dhnanjay mahadik, mahadevrao mahadik
Kolhapur child accident latest news
Marathi News Esakal
www.esakal.com