esakal | NDRF च्या 2 तुकड्या कोल्हापुरात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking - NDRF च्या 2 तुकड्या कोल्हापुरात दाखल

Breaking - NDRF च्या 2 तुकड्या कोल्हापुरात दाखल

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यातील (kolhapur district) पूर स्थिती गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर आज एनडीआरएफच्या (NDRF) दोन तुकड्या कोल्हापूरमध्ये दाखल झाल्या आहेत. 25-25 स्वयंसेवकांच्या या दोन तुकड्यांपैकी एक तुकडी शिरोळ तालुक्यासाठी तर दुसरी तुकडी करवीर आणि कोल्हापूर शहरासाठी (kolhapur rain update) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शिरोळ (Shirol) तालुक्यासाठी असणारे बदल सध्या शिरोळमध्ये दाखल झाले आहेत, तर उर्वरित एक पथक पर्याग चिखली याठिकाणी रवाना होत आहे. कोल्हापूरची पूरस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे एनडीआरएफने त्यांच्या नियोजनानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार (rahul rekhavar) यांनी आज दिल्या आहेत.

हेही वाचा: दुपारी 3 चे Update - पंचगंगा इशारा पातळीवर

loading image