esakal | दुपारी 3 चे Update - पंचगंगा इशारा पातळीवर; पूरस्थितीमुळे अनेक मार्ग बंद
sakal

बोलून बातमी शोधा

दुपारी 3 चे Update - पंचगंगा इशारा पातळीवर

दुपारी 3 चे Update - पंचगंगा इशारा पातळीवर

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (kolhapur district) पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर दुपारी तीन वाजता पंचगंगा नदीची (panchgnaga river water level) पाणीपातळी 39 फुटावर पोहोचली. 39 ही इशारा पातळी असून 43 फुट ही धोका पातळी आहे. आजपासून पुढे ७२ तास असाच मुसळधार (heavy rain in kolhapur) पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (MID)आहे. जिल्हापूर नियंत्रण कक्ष व पाटबंधारे विभाग कोल्हापूर यांच्याकडील आकडेवारीनुसार ही माहिती दैनिक 'सकाळ'ला मिळाली आहे. (kolhapur rain update)

हेही वाचा: अलमट्टी धरणातून 97 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

कर्नाटकातील अलमट्टी धरणातून (almatti dam) 97 हजार क्यूसेक तर हिप्परगी - धरणातून 74000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तरीही कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुपारी दोन वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ही 38 फुट 10" इंच. होती तर एकुण 84 बंधारे पाण्याखालील होते. त्यामुळे जिल्ह्यातील 25 हून अधिक ठिकाणी वाहतूक बंद व पर्यायी मार्गाने ठेवावी लागली आहे. धरणातील विसर्ग वाढत असून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून ही पूरबाधित गावांमध्ये स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

तसेच पुण्याहूर एनडीआरएफच्या (NDRF) दोन तुकड्याही कोल्हापुरातील पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दाखल झाली आहेत. कोल्हापूर शहरामध्ये लक्ष्मीपुरीतील कुंभार गल्ली, मंगळवार पेठेतील रेणुका मंदिर, रामानंदनगर, अॅस्टर आधार हॉस्पिटल परिसरातील पुलावरही पाणी आल्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हेही वाचा: कोल्हापुरात उद्या ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सावधानतेचा इशारा

बंधारे - 84 जिल्ह्यातील पाणी विसर्ग माहिती पुढील प्रमाणे -

१) राधानगरी -1425 विसर्ग क्युसेक

२) तुळसी धरण - विसर्ग - 0 क्युसेक

३) कुंभी धरण- विसर्ग-780 क्युसेक्

४) कासारी धरण - विसर्ग-5500 कुंभी - 780 क्युसेक

५) वारणा धरण - विसर्ग - 1125 क्युसेक

६) दुधगंगा - विसर्ग-100

७) कडवी - 220

८ ) कोयना धरण- 0 क्युसेक्स विसर्ग

९ ) अलमट्टि - 97000 विसर्ग क्युसेक्स

१० ) हिप्परगी - 74000

वेदगंगा नदीवरील सुक्याचीवाडी, तांबाळे, अनप, दासेवाडी, वाघापूर, कडगाव, निळपण, गारगोटी, म्हसवे, करडवाडी, शेळोली, शेणगाव बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.

हेही वाचा: PHOTO - पावसाचं रौद्ररुप; चिपळूणात ढगफुटी, जनजीवन विस्कळीत

loading image