मुरगूड (ता. कागल) येथील क्लारिन बारदेस्कर सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र, चिखली येथे कामावर गेल्या होत्या. ट्रॅक्टरच्या चाकाखाली क्लारिन बारदेस्कर सापडल्या. चाक अंगावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मुरगूड : मुरगूड-निपाणी राज्य मार्गावर सुरुपली (ता. कागल) जवळ उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून मुरगूड येथील महिला आरोग्य कर्मचारी ठार झाली. क्लारिन संतान बारदेस्कर (वय ४८) असे त्यांचे नाव आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.