esakal | 'गोकुळ'चे कोरोना बाधित ठरावदार पीपीई किट घालून करणार मतदान

बोलून बातमी शोधा

'गोकुळ'चे कोरोना बाधित ठरावदार पीपीई किट घालून करणार मतदान
'गोकुळ'चे कोरोना बाधित ठरावदार पीपीई किट घालून करणार मतदान
sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक 70 मतदान केंद्रावर घेतली जाईल. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व अटी-शर्थींचे पालन करुनच मतदान होईल. सत्तारूढ गटाने निवडणूक रद्द करण्यासाठी अनेक पर्याय अवलंबले आहेत. आता जागतिक न्यायालयाकडे न जाता प्रत्यक्ष रणांगणात उतरून निवडणूक लढवावी, असे आव्हान पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. तर ज्या ठरावदारांना कोरोना झाला आहे, असे ठरावदार पीपीई किट घालून मतदान करतील. असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. कसबा बावडा येथील पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी सतेज पाटील म्हणाले, गेले वर्षभर प्रशासन सर्व नियम अटी पाळून ही निवडणूक घेईल. मतदारांना याचा त्रास होणार नाही. तालुकानिहाय मतदान आहे. त्यामुळे एका मतदान केंद्रावर 50 मतदानच होईल. त्यामुळे सर्व सुरिक्षतता पाळली जाणार आहे. सकाळी 8 ते 5 दरम्यान, मतदान होणार आहे. एका मतदान केंद्रावर 100 मतदान घेतले जाणार होते. आता पन्नासच घेतले जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे दूध उत्पादकांनाचा आताच नैतिक विजय झाला आहे.

हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सतेज पाटीलांचा सत्तारूढ संचालकांना सल्ला

दूध उत्पादकांच्या दूधाला जास्ती-जास्त दर देण्यास आम्ही कटीबध्द राहणार आहोत. विरोधकांनी आता जागतिक न्यायालयाकडे जावू नये. आतापर्यंत उच्च न्यायालय झाले. सर्वाच्च न्यायालय झाले, त्यामुळे जागतिक न्यायालयाकडे जावू नये. सभासदांची न्याय बाजु घेवून कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. सत्तारूढ गटाने हा निर्णय मोठ्या मनाने मान्य करुन निवडणूकीला समोरे गेले पाहिजे. दरम्यान, जर ठरावदार कोरोना पॉझिटिव्ह असतील तर शेवटच्या तासात त्यांना पीपीई किट घालून मतदान करता येणार आहे.

परवा राजस्थानमध्ये झालेल्या मतदानात कोरोना झालेल्या आमदारांनी पीपीई किट घालूनच मतदान केले होते. पश्‍चिम बंगालचे मतदान झाले. लोकशाहीत निवडणूका स्विकारल्या आहेत. यातून जो निर्णय आहे, तो स्विकारला पाहिजे. राज्य शासनानेही सर्व नियम पाळून निवडणूक घेवू असे सांगितले आहेत. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले उपस्थित होते. 

हेही वाचा: सत्ताधाऱ्यांना धक्का : "गोकुळ' च्या मतदानाचा मार्ग मोकळा

नियम पाळून निवडणूक

न्यायातील दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकूण घेतले. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूकीचे दोनच टप्पे राहिले आहेत. अशावेळेला निवडणूक थांबण्यापेक्षा कोरोना संसर्गाचे सर्व नियम शंभर टक्के पाळून निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही.