निपाणी : मूळगाव आप्पाचीवाडी मात्र सध्या गडहिंग्लज येथे राहणाऱ्या सौरभी भास्कर कुरणे ही नात्या-गोत्यातच नव्हे, तर मित्र-मैत्रिणींमध्येही प्रिय होती. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून (Public Service Commission) आयपीएस (IPS) अधिकारी होण्याची जिद्द तिने उराशी बाळगली होती. पण, गुरुवारी (ता. २९) दुपारी अंघोळीला गेली असताना बाथरूममध्ये अचानक बेशुद्ध पडली अन् तिच्या अकाली निधनाने तिचे आयपीएसचे स्वप्न भंगले.