निपाणी - मुरगूड रोडवर अपघातात सोनगेचा तरुण जागीच ठार : Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kiran Vader

किरणचे दोन वर्षापूर्वी वडील आणि ६ महिन्यापूर्वी आईचेही निधन झाले आहे.

निपाणी - मुरगूड रोडवर अपघातात सोनगेचा तरुण जागीच ठार

मुरगूड (कोल्हापूर) : निपाणी - मुरगूड रोडवर (Nipani Murgud) सोनगे (ता.कागल) येथे झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. किरण अनंत वडेर (Kiran Vader)(वय ३८,रा.सोनगे ) असे मृताचे नाव आहे.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, आज सकाळी नेहमीप्रमाणे किरण वडेर हा शेतीकामासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालला होता. याच दरम्यान मुरगूडच्या दिशेने जाणाऱ्या भाजीपाला वाहतुक करणाऱ्या टेम्पो क्रमांक ( एम.एच. १२ जे एफ ०९१९ ) ने किरणला पाठीमागून जोराची धडक दिली.

या धडकेनंतर त्याला तब्बल ६० फूट फरफट नेले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की त्याच्या डोक्याला मार लागून किरणचे केस टेम्पोच्या काचेमधे अडकलेले होते. किरणचे दोन वर्षापूर्वी वडील आणि ६ महिन्यापूर्वी आईचेही निधन झाले आहे. तो अशिक्षीत होता. त्यामुळे त्याचे लग्नही झालेले नव्हते. त्याचा अशा अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

loading image
go to top