Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

Mahmad Khalif Murder Near Tavandi Ghat : निपाणीतील तवंदी घाटाजवळ महमद समशेर खलीफ यांचा दगडाने ठेचून खून झाला. धारदार शस्त्रानेही हल्ला झाल्याचा संशय असून पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
Mahmad Khalif murder Nipani

Mahmad Khalif murder Nipani

esakal

Updated on

निपाणी/गडहिंग्लज : येथील राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटालगत डोंगराच्या पायथ्याशी कमी वर्दळ असलेल्या रस्त्यावर दगडाने ठेचून एकाचा खून करण्यात आला. हा प्रकार काल (ता. २६) सकाळी उघडकीस आला. महमद समशेर खलीफ (वय ५२, रा. हिटणी, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com