
Kasaba Beed Sarpanch : कसबा बीड येथील लोकनियुक्त सरपंच व कुंभी कारखाना संचालक उत्तम वरुटे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव ३२८ मताधिक्क्याने मंजूर झाला. आज झालेल्या ग्रामसभेत चुरशीने मतदान होऊन ठरावाच्या बाजूने १०४१, तर ठरावाच्या विरोधात ७१३ मते पडली. ५५ मते बाद झाली. यामुळे येथील सरपंचपद रिक्त झाले आहे. निवडणूक अधिकारी म्हणून करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी काम पाहिले.
आज सकाळी ८ ते ११ या वेळेत ग्रामसभेला सुरुवात झाली. यावेळी १८३४ मतदार उपस्थित होते. एवढ्याच मतदारांना ११ ते ४ या वेळेत मतदानाचा अधिकार मिळाला. मतमोजणी मतदान केंद्रावरच झाली. या प्रक्रियेत पंचायत समितीचे ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.