
Criminal Killed Police
esakal
Vijapur Police : विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील रामपूर गावाच्या बाहेर शनिवारी (ता. १८) सकाळी झालेल्या पोलिस चकमकीत शहरातील कुख्यात गुंड युनूस पटेल (वय ३५) ठार झाला. अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने हल्ला केल्याने स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली.