शासनाच्या लेक लाडकी योजनेपासून प्रेरणा घेऊन नृसिंहवाडी येथे जन्म घेणाऱ्या मुलीला दहा हजार रुपये ठेव पावती स्वरूपात ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येणार आहेत.
नृसिंहवाडी : जागतिक महिला दिनाचे (Women's Day) औचित्य साधून नृसिंहवाडी ग्रामपंचायतीने (Nrusinhawadi Gram Panchayat) ‘गावची लेक लाडकी’ या योजनेला सुरुवात केली आहे. यामध्ये नृसिंहवाडीमधील जन्म घेतलेल्या मुलीच्या नावे ग्रामपंचायतीतर्फे दहा हजार रुपये ठेव पावती देण्यात येणार आहे, अशी घोषणा सरपंच चित्रा रमेश सुतार, माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी केली.