नृसिंहवाडी : येथील दत्त मंदिरात (Datta Mandir) आठवडाभर दक्षिणद्वार सोहळ्याच्या निमित्ताने पाणी पातळी कमी जास्त होत आहे. आज समोरील बाजूस कृष्णा नदी पात्रासमोर मंदिरात दोन फूट पाण्यात राहूनच भाविकांनी श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले. दरम्यान, नदीपात्रातील पाणी कमी होत असून, आज (ता. ३०) मंदिर दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता आहे.