ऑईलने पेट घेतल्याने आग आतील भागात पसरत गेली. आगीचे व धुराचे लोळ छतापर्यंत उठले होते. मोठ्या दबावामुळे ऑईल साठवलेल्या टर्बाईनच्या स्फोट झाला.
कोल्हापूर : कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात (Rajaram Sugar Factory Fire) काल सकाळी सव्वादहाच्या दरम्यान ‘ड्रेन क्लिनिंग’ कामादरम्यान शॉर्टसर्किटने ऑईल टर्बाईनचा मोठा स्फोट झाला. वंगणामुळे आगीचा भडका उडाला. आग पसरत गेल्याने वायरिंग, गॅसकिट जळाले. त्यात पाच कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.