esakal | लाच देणाऱ्याला पकडून देणाराच अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात  

बोलून बातमी शोधा

one arrested taking bribe kolhapur ichalkaranji

गेल्या चार महिन्यात दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने खळबळ माजली आहे

लाच देणाऱ्याला पकडून देणाराच अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात  

sakal_logo
By
ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : लाच देताना एका वीज ग्राहकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात पकडून  देणारा सहाय्यक अभियंता सुनील चव्हाण बुधवारी स्वतः लाच घेताना रंगेहाथ सापडला. महावितरण कार्यालयात लाचखोर चव्हाण एसीबीच्या कचाट्यात सापडला. घरगुती विद्युत कनेक्शन देण्यासाठी सहा हजार रूपयांची लाच कार्यालयामध्ये घेताना अर्बन शाखेचा सहाय्यक अभियंता चव्हाण याच्यावर  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. 

गेल्या चार महिन्यात दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने खळबळ माजली आहे. 

चार दिवसांपूर्वी अर्बन शाखा कार्यक्षेत्रातील एका वीज ग्राहकाकडून घरगुती कनेक्शनसाठी सहा हजार रुपयांची मागणी सहाय्यक अभियंता चव्हाण यांनी केली होती. एका मक्तेदाराला वारंवार मध्यस्थी घालून पैशाची मागणी ते करत होते. मक्तेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार बुधवारी दुपारच्या सुमारास या  पथकाने महावितरण कार्यालयात सापळा रचला चव्हाण याला सहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.  
 
संपादन - धनाजी सुर्वे