नेर्ले (सांगली) - केदारवाडी (ता. वाळवा) येथील एक युवक "एका दिवसासाठी पुण्याला गेला" आणि कोरोना पॉजिटिव्ह झाल्याची घटना घडली आहे. हा युवक शेजारील साखरपुढ्यातही सहभागी झाला असल्याचे समजते. त्याच्या सोबत किर्लोस्करवाडी (ता. कराड) येथील एका युवतीसह गावातील एक युवती, गाडी चालक व संबंधित कुटुंब यांचे स्वॅब घेण्यात येनार आहेत. त्यांना इस्लामपूर येथे संस्थात्मक कोरंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे केदारवाडी त घबराट निर्माण झाली आहे.
केदारवाडी हे १२०० लोकसंख्या असणारे गाव आहे. भाटवाडीच्या जावया नंतर आता महामार्गालगत असणाऱ्या या गावातील पुण्यात शिक्षण घेणाऱ्या युवकाला कोरोणा झाला आहे. ३० तारखेला आपले साहित्य आणायला हा युवक, दोन युवती आणि चालक असे पुण्याला गेले होते. या युवकास चार तारखेला ताप आल्याने इस्लामपूर येथे त्याला अलगिकरन कक्षात ठेवण्यात आले होते. त्याचा स्व्ॅब पाठवल्यानंतर आज त्याचा अहवाल पॉजिटिव्ह आला. त्याचा अहवाल प्राप्त होताच वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे यांनी धाव घेतली. सध्या केदारवाडी गाव सील करन्यात आले आहे. तो परिसर कंटेनमेंट झोनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. अशा सेविका यांच्या माध्यमातून सर्वे सुरू करण्यात आला आहे. ग्रामपंचायतच्या वातीने तो भाग निर्जंतुक केला आहे.
हे पण वाचा - व्हिडीओ : गरीब मराठा समाजाचे आरक्षण टिकवणे म्हणजे...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.