कोल्हापूरकरांना आधार देतोय सव्वाशे वर्षांपूर्वीचा सैनिकांचा दवाखाना

One hundred and fifty years ago hospital in kolhapur hospital initially used to treat soldiers
One hundred and fifty years ago hospital in kolhapur hospital initially used to treat soldiers

कोल्हापूर : कोरोनामुळे सीपीआर हॉास्पिटल फुल्ल आहे . त्यामुळे इतर आजार व विकाराच्या रुग्णांनी जायचे कोठे हा  प्रश्न लाईन बाजारच्या सर्विसेस हॉस्पिटलने  सहज सोडवला आहे. सरकारी हॉस्पिटल म्हणजे "नको रे बाबा" असा अजूनही बहुतेकांचा समज आहे. किंबहुना सरकारी हॉस्पिटल बद्दल गैरसमज पसरवणारी एक फार मोठी यंत्रणाच कार्यरत आहे.या पार्श्वभूमीवर लाईन बाजारचे सर्विसेस हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल एकदा कोल्हापूरकरांनी डोळ्याखालून घालण्याची गरज आहे.

एखाद्या जुन्या हवेली सारख्या दिसणाऱ्या या हॉस्पिटलची पायाभरणी छत्रपती शाहू महाराज आणि तत्कालीन  ब्रिटीश पोलिटिकल एजंट कर्नल रे यांच्या हस्ते 1897 साली झाली. या हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला सैनिकांच्या वर उपचार केले जात होते. पण नंतर सर्वांसाठी त्याचा वापर सुरू झाला .हॉस्पिटल देखणे तर आहेच पण सरकारी हॉस्पिटल किती स्वच्छ असू शकते, ते किती  चांगली सेवा देऊ शकते याचे हे हॉस्पिटल एक उदाहरण आहे . खिशात पैसे असले तरच दवाखान्याची पायरी चढावी हा समज या हॉस्पिटलच्या बाबतीत अपवाद आहे. कोल्हापुरातल्या 90 टक्के लोकांनी हे हॉस्पिटल अजूनही पाहिलेले नाही.

ब्रिटिश कालीन धाटणीची वास्तु हॉस्पिटलला लाभली आहे. सभोवती  हिरवीगार झाडी आहे.  आता जागा पुरत नसल्यामुळे इमारतीचा विस्तारही करण्यात आला आहे. आता मुख्य सीपीआर हॉस्पिटल इतर आजार व विकाराच्या उपचारासाठी बंद आहे. पण  या सर्विसेस हॉस्पिटलने त्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली आहे .सरकारी हॉस्पिटल म्हणजे टीका करायला एकदम सोपे. पण  राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते आणि त्यांच्या देखरेखीखाली  सव्वाशे वर्षांपूर्वी उभे राहिलेले हे हॉस्पिटल कोल्हापूरकरांनी एकदा पाहण्याची खरोखर गरज आहे.डॉ , उमेश कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे घडवून दाखवले आहे.

संपादन -  अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com