लॉकडाऊनला महिना पूर्ण ; निपाणीचे 'अर्थकारण लॉक'...

one month completes Lockdown in Nipani lockdown effect on sity economy
one month completes Lockdown in Nipani lockdown effect on sity economy
Updated on

निपाणी - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे निपाणी बाजारपेठ पूर्णपणे बंद असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. परिणामी व्यापारी, उद्योजक, मजूर, खासगी नोकरदार, शेतकरी, बिडी, बांधकाम कामगार अशा अनेकांना आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. या सर्वामुळे अर्थकारणाचे ही लॉक डाउन झाले आहे. दिवसेंदिवस सर्वसामान्य कुटुंबांची वाताहत होत असल्याने लॉकडाउन कधी उठणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने २२ मार्चपासून लोक डाउनला सुरुवात केली आहे.२२ एप्रिल ला एक महिना पूर्ण झाला आहे.निपाणी शहर हे व्यापाऱ्यांचे शहर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. मात्र व्यवहार ठप्प झाल्यानंतर अर्थचक्र थांबले आहे. परिणामी विविध दुकानात काम करणाऱ्या मजुरांची उपासमार होत आहे.

तसेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर  होणारे तंबाखूचे सौदे होत नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. कोरोना आटोक्यात आल्यानंतर लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडल्यानंतर व्यापार, उद्योग, व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू होणार की नाही, याबाबतही शंका आहे. तसेच उद्योग व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजुरांना काम मिळेल की नाही, याची शाश्वतीही नाही. त्यामुळे भविष्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर बनणार आहे. शहरातील कापड,भांडी, बिडी आणि इतर सर्वच व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने अर्थचक्र थांबले असून मोठी अडचण निर्माण झाली आहे. गुरुवार (ता. २३) पासून तर किराणा दुकाने ही बंद झाल्याने संचारबंदी सदृश परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार थांबल्याने परिस्थिती पूर्वपदावर कधी येणार याची चिंता सर्वांना लागून राहिली आहे.

भाजीपाला उत्पादक संकटात

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून अनेक शेतकरी भाजीपाल्याची पिके घेतात. यंदाही ही पिके घेतली असताना कोरोनामुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
 

'दरवर्षी फेब्रुवारी- मे महिन्यात शेतकऱ्यांची ऊस बिले व तंबाखू विक्रीतून रक्कम उपलब्ध होत. त्यामुळे या काळात सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी गर्दी होत. पण यंदा कोरोनामुळे महिनाभरापासून दुकाने बंद असल्याने सराफ व्यावसायिकावर मोठा परिणाम झाला आहे.'
- सुरेश शेट्टी,सुवर्णकार, निपाणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com