
तुटलेल्या वीज तारेला स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू; सिरसेतील दुर्घटना
आवळी बुद्रुक (कोल्हापूर) : तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होवून सिरसे (ता. राधानगरी) येथील तरुणाचा मृत्यू झाला. रणजीत हरीश टिपूगडे (वय 34) असे मृत तरुणाचे नाव आहे. राधानगरी-कोल्हापूर मार्गावर सिरसे हद्दीत आज सकाळी ही दुर्घटना घडली असून राधानगरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आपल्या शेती कामानिमित्त चाललेल्या हरिश टिपूगडे या तरुणाचा तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्यानेच टिपूगडे याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संतप्त झालेल्या सिरसे ग्रामस्थांनी आवळी बुद्रुक वीज उपकेंद्र येथे या घटनेचा जाब विचारण्यासाठी संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शवविच्छेदन सोळांकुर ग्रामीण रुग्णालयात झाले. सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. टिपूगडे यांच्यामागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा: इचलकरंजीत तांबे मळ्यातील विहीरीत आढळला अनोळखी मृतदेह
Web Title: One Youth Died In Shirse Radhanagari Reason Electricity Shock In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..