Onion Price Crash Sparks Market Uncertainty : उसात कांदा लावणीकडे शेतक-यांनी पाठ फिरवली आहे. साहजिकच बाजारात कांदा रोपे ग्राहकांच्या मागणीअभावी कोमेजू लागली आहेत. महागडे बियाणे घेऊन वाढवलेल्या रोपांना मागणी नसल्याने रोप विक्रेत्यांत चिंतेचे वातावरण आहे.
गडहिंग्लज : भाजी मंडईत कांद्याचा दर घसरला आहे. १५ रुपये किलो अशी विक्री सुरू असल्याने उत्पादक गारठले आहेत. उत्पादन खर्चही निघणार नसेल तर नवा कांदा लावायचा कशाला? अशी उत्पादकांत भावना आहे.