Online fertilizer quota crisis: ऑनलाइन खत बुकिंगचा बोजवारा : युरिया–डीएपी कोट्यामुळे बळीराजा हैराण, दुकानांत साठा असूनही फक्त एकच बॅग

ऑनलाइन खत बुकिंगच्या नव्या प्रणालीमुळे युरिया-डीएपीवर कडक कोटा; दुकानांत साठा असतानाही शेतकऱ्यांना एकरी फक्त एकच बॅग, आडसाली उसासह पिकांच्या वाढीवर संकट
Fertilizer Shortage India

online fertilizer booking urea dap quota farmers problems kolhapur adasali sugarcane

esakal

Updated on

​कुंडलिक पाटील

कुडित्रे : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्यांतर्गत लागू करण्यात आलेली नवीन ऑनलाइन खत बुकिंग प्रणाली शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे. दुकानांसमोर लागणाऱ्या लांबलचक रांगा बंद होतील, असे दावे कृषी विभागाने केले असले तरी वास्तवात मात्र शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. अ‍ॅपवरून बुकिंग करताना तासनतास वेळ वाया जात असून, दुकानांत गेल्यावर एकरी अवघी एकच बॅग युरिया आणि डीएपी हातावर टेकवली जात आहे. तीन हंगामांत मिळून एकरी फक्त एक एकच बॅग मिळणार असल्याने, आडसाली उसासह इतर पिके कशी जगवायची आणि वाढवायची असा उद्विग्न सवाल बळीराजा विचारत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com