Online Gaming Addiction : ऑनलाईन गेमिंगचा नाद बेतला जीवावर! कोल्हापुरातील 24 वर्षीय तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; कर्जबाजारी झाल्याचा चिठ्ठीत उल्लेख

Impact of Online Gaming Addiction on Youth : ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे आर्थिक नुकसान आणि वाढत्या नैराश्यातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, डिजिटल व्यसनाचा गंभीर परिणाम समोर आला आहे.
youth end life due to gaming debt and depression

youth end life due to gaming debt and depression

esakal

Updated on

इचलकरंजी : ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने कोरोची (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. आदित्य मिलिंद कोळी (वय २४, रा. एस. टी. स्टँड मागे, कोरोची) असे त्याचे नाव आहे. त्याने गेमिंगमुळे आलेल्या कर्जबाजारीपणा (Financial Loss and Mental Health Crisis) आणि नैराश्यातून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com