गडहिंग्लज शहरात केवळ 36 रुग्ण ऍक्‍टिव्ह; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे "एवढे'

Only 36 Patient Corona Active In The Town Of Gadhinglaj Kolhapur Marathi News
Only 36 Patient Corona Active In The Town Of Gadhinglaj Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 150 वर असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्के असल्याने ऍक्‍टिव्ह रुग्ण केवळ 36 च आहेत. हे चित्र दिलासादायक आहे. एकूण रुग्णसंख्येत एका ऑगस्ट महिन्यातील संख्या ही 112 इतकी आहे. आतापर्यंत सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

गडहिंग्लज पालिकेने शासनाच्या सूचनांची अंमलबजावणी आणि स्थानिक लॉकडाउन या माध्यमातून सुरवातीचे तीन महिने शहरात कोरोनाला प्रवेश करून दिला नाही. अनलॉकची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर 19 जून रोजी शहरात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतरही जून आणि जुलै महिन्यात केवळ 38 रुग्ण शहरात होते. त्यातील बहुतांशी बरेही झाले होते, परंतु ऑगस्टमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. रोज रुग्णसंख्येचा आलेख वाढत गेल्याने चिंता व्यक्त झाली. सर्व व्यवहार सुरळीत ठेवून पालिकेने उपाययोजना सुरू ठेवल्या. परंतु, बाधितांच्या प्रथम संपर्कातील लोकही पॉझिटीव्ह येऊ लागल्याने ही संख्या वाढतच गेली. 30 ऑगस्टअखेर शहरातील रुग्णसंख्या 150 वर पोहोचली. 

कागदावर ही संख्या मोठी दिसत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या केवळ 36 रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील काही शेंद्री माळावरील कोविड सेंटर, उपजिल्हा कोविड रुग्णालय आणि सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. मृत्यूची संख्या सात असून त्याची टक्केवारी 4.6 इतकी आहे. तरी नागरिकांनी खबरदारी बाळगणेही तितकेच गरजेचे आहे. हा कालावधी कोरोना विस्फोटाचा आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता बेड आणि ऑक्‍सिजन उपलब्धतेतही अडचणी येत आहेत. विनाकारण बाहेर न पडता घरीच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. 

समूह संसर्ग नियंत्रित 
शहरात समूह संसर्ग नियंत्रित ठेवण्यात यश मिळाले आहे. आतापर्यंत केवळ 17 जणांना समूह संसर्गातून बाधा झाली आहे. कोविड बाधित व्यक्तीच्या प्रथम संपर्कातील 94 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून प्रवासाची हिस्ट्री असलेले आणि बाहेरून आल्यामुळे बाधितांची संख्या 36 इतकी आहे. यावरून समूह संसर्गातून वाढणाऱ्या कोरोनाला शहरात नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे चित्र आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com