विमानासाठी केवळ तीन-चारच प्रवासी 

विमानासाठी केवळ तीन-चारच प्रवासी 
Updated on: 

कोल्हापूर : जनता कर्फ्यू असतानाही कोल्हापूर विमानतळ सुरू होते. केवळ मुंबई विमानाची फेरी रद्द केल्यामुळे उर्वरित फेऱ्या सुरू राहिल्या. हैदराबाद, तिरुपती, बंगळूर ही सर्व विमानसेवा सुरू राहिली, मात्र प्रवासी तीन-चारच होते. संपूर्ण विमानतळावर शुकशुकाट होता. पोलिस आणि स्थानिक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त तेथे कोणीही नव्हते. काही कर्मचारी प्रवासी बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुस्तक वाचत बसून होते. 

आयकर विभागातील दोघे अधिकारी दिल्लीला जाणार असल्यामुळे सकाळी दहा वाजताच विमानतळावर येऊन बसले होते. एका मित्राने दुसऱ्याला विमानतळावर सोडून पुन्हा ते परत गेले. शेजाऱ्यांना घेऊन पुन्हा विमानतळावर आले. पोलिसांनी त्यांना ठिकठिकाणी अडवले. स्वतःची ओळख सांगून ते विमानतळापर्यंत पोचले.

सायंकाळीच्या हैदराबाद विमानाने ते जाणार असले तरीही दिवसभर विमानतळावर बसून राहिले. त्यांनी खिशातच सॅनिटायझर ठेवला होता. दुचाकीवरून विमानतळावर सोडण्यासाठी आलेल्या शेजाऱ्यांना धन्यवाद देण्यासाठी हस्तांदोलन केल्यानंतर तातडीने सॅनिटायझरने हात धुतले. यानंतर त्यांनी "आता रिलॅक्‍स झालो,' अशी भावना व्यक्त केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Radhanagari honey bee farming development project
Kolhapur RTO Marathi language proficiency report
Ichalkaranji minor girl missing case latest news
Maharashtra livestock insurance scheme 85 percent subsidy
Marathi News Esakal
www.esakal.com