esakal | जिल्हा परिषदेतील विरोधक यासाठी झाले आक्रमक; मागितली विविध प्रकरणांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Opponents in the Zilla Parishad became aggressive for this;

विरोधकांनी स्वनिधीच्या काढलेल्या माहितीनंतर सत्ताधारी सदस्यांनाच नव्हेतर काही पदाधिकाऱ्यांनाही वस्तुस्थिती समजली. त्यामुळे आज जिल्हा परिषदेत कोण उपस्थिती लावणार, याकडे लक्ष होते; मात्र आज एकही पदाधिकारी जिल्हा परिषदेकडे फिरकला नाही.

जिल्हा परिषदेतील विरोधक यासाठी झाले आक्रमक; मागितली विविध प्रकरणांची माहिती

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर ः जिल्हा परिषदेची सर्वसाधारण काल वादात सभा वादात झाली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यामध्ये थेट अध्यक्षांवरच आरोप झाले. काही अधिकाऱ्यांनाही या सर्व प्रकारास जबाबदार धरले. यानंतर आज मात्र जिल्हा परिषदेकडे एकही पदाधिकारी व प्रमुख अधिकारी फिरकले नाहीत, असे असले तरी विरोधकांनी मात्र विविध माहिती मागण्यासाठी दोन डझन पत्रे देऊन सत्ताधारी व अधिकाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. 
विरोधकांनी स्वनिधीच्या काढलेल्या माहितीनंतर सत्ताधारी सदस्यांनाच नव्हेतर काही पदाधिकाऱ्यांनाही वस्तुस्थिती समजली. त्यामुळे आज जिल्हा परिषदेत कोण उपस्थिती लावणार, याकडे लक्ष होते; मात्र आज एकही पदाधिकारी जिल्हा परिषदेकडे फिरकला नाही. एका सदस्याने बंगल्यावर थांबूनच जिल्हा परिषदेतील कामाचा अंदाज घेतला. काही पदाधिकारी, अधिकारी क्‍वॉरंटाईन झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान विरोधकांनी विविध खातेप्रमुखांना पत्रे देऊन निधी वाटपाचा तपशील मागितल्याने पुढील काही दिवस हा वाद सुरू राहणार असल्याचे चित्र आहे. 

व्हॉटसग्रुपने वाढवला तणाव 
जिल्हा परिषदेचा कारभार गतिमान करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने व्हॉटसअप ग्रुप काढला आहे. यात सदस्यांसह अनेक महिला सदस्यांचे पती, दीरांचाही समावेश आहे. महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती वंदना मगदूम यांचे दीर राजू ग्रुपवर आहेत. त्यांनी सर्वसाधारण सभा सुरू होण्यापुूर्वी बैठकीस उपस्थित राहण्याबाबत या ग्रुपवर प्रश्‍न उपस्थित केला. त्यामुळे त्यांना या ग्रुपमधून काढले. मात्र सत्ताधारी गटाच्या महिला सदस्यांचे पती ग्रुपवर आहेत. अध्यक्ष बजरंग पाटील सोशल मीडिया वापरत नाहीत. तरीही श्री. पाटील यांचे नाव पुढे करून हा उद्योग केला. श्री. मगदूम यांनी अध्यक्षांचे पी.एं.कडे पाठपुरावा करून हा उद्योग कोणी केला याची माहिती घेतली. यानंतरच हा तणाव वाढला. 
 

loading image
go to top