विरोधक पुन्हा एकत्र ? राष्ट्रवादीत दोन गट झाल्याने नवे वळण

opposite to leader party together run election in null kolhapur report by vitthal chougule
opposite to leader party together run election in null kolhapur report by vitthal chougule

नूल (कोल्हापूर) : माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि जनता दल हे दोन पारंपरिक विरोधक यावेळीही एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने राजकारणाने नवे वळण घेतले आहे. परिणामी ही निवडणूक चुरशीची होणार आहे. निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार याचीही उत्सुकता आहे.

गतवेळच्या निवडणुकीत पारंपरिक विरोधक असलेल्या जनता दल आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन माजी आमदार ॲड. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी केली. भाजप-शिवसेना युतीला हरवून आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले. आता राष्ट्रवादीत जयसिंग चव्हाण व जितेंद्र शिंदे असे दोन गट तयार झालेत. शिवपार्वती दूध संस्थेच्या निवडणुकीपासून एकमेकापासून दुरावलेले जयसिंग चव्हाण व पी. एम. चव्हाण आणि माजी सभापती इक्‍बाल काझी यांनी एकत्र येत जनता दलालाबरोबर आघाडी करून निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. त्याला काझी यांनी दुजोराही दिला.

पाच वर्षात जनता दलाने सापत्न वागणूक दिल्याने यावेळी स्वतंत्र आघाडी करण्याचा विचार शिंदे यांनी बोलून दाखविला. कोण येतील त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनता दलाचा बालेकिल्ला म्हणून नूल गावची ओळख आहे. गावच्या निवडणुकीत ॲड. शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भक्कम आघाडीची रचना करून त्यांना कडवे आव्हान उभे करण्याच्या हालचालीही सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी जुनी मंडळी प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र होणार की नाही, बाजार समितीचे माजी सभापती श्रीरंग चौगुले यांच्यासह मल्हार शिंदे व डॉ. स्वप्नील शिंदे यांची भूमिका काय राहणार?, याकडे लक्ष आहे.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com