कोल्हापुरातील 'ही' 27 खाजगी रूग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश...

Order to take possession of private hospitals in Kolhapur
Order to take possession of private hospitals in Kolhapur
Updated on

कोल्हापूर - अत्यवस्थ रूग्णांना खाजगी रूग्णालयांनी दाखल करून न घेतल्याने काल (ता. 24) एकाच दिवशी तीन रूग्णांचा मृत्यु झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. मलिनाथ कलशेट्टी यांनी शहरातील 27 खाजगी रूग्णालये ताब्यात घेत असल्याचे आदेश आज काढले. प्रत्येक पाच रूग्णालयामागे एक याप्रमाणे महापालिकेच्या सात अधिकाऱ्यांची यासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

दरम्यान, या खाजगी रूग्णालयात कोरोनावर उपचार करण्यासाठी काही बेड आरक्षित ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.या आरक्षित बेडची माहिती महापालिकेच्या वॉर रूमला कळवण्याची जबाबदारी संबंधित डॉक्‍टरांसह समन्वयकांवर दिली आहे. या आदेशाने छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयाखेरीज या 27 रूग्णालयात रूग्णांना दाखल करून घेणे या आदेशान्वये बंधनकारक रहाणार असे या आदेशात म्हटले आहे. 

राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर खाजगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या डॉक्‍टरांनी किती दर लावायचे याची अधिसुचना 21 मे रोजी प्रसिध्द केली आहे. त्या अधिसुचननेनुसार दाखल होणाऱ्या रूग्णांकडून दर आकारणी करण्याचेही या आदेशात म्हटले आहे. 

ताब्यात घेतलेली रूग्णालये व समन्वयक असे 

  • जानकी नर्सिंग होम-राजारामपुरी तिसरी गल्ली, सिटी हॉस्पिटल-राजारामपुरी 8 वी गल्ली, साई कार्डियाक-राजारामपुरी 6 वी गल्ली, मोरया हॉस्पिटल-राजारामपुरी 9 वी गल्ली,सिध्दीविनायक हॉस्पिटल-टाकाळा (समन्वयक-शोभा घाटगे, वरिष्ठ लेखापरीक्षक) 
  • सिध्दी विनायक हार्ट हॉस्पिटल-शास्त्रीनगर, ऍस्टर आधार हॉस्पिटल-शास्त्रीनगर, मंगलमुर्ती हॉस्पिटल-शास्त्रीनगर, सिध्दांत हॉस्पिटल-शेंडा पार्क,रिंगरोड (समन्वयक-दिपक कुंभार, वरिष्ठ लेखापरीक्षक) 
  • नॉर्थस्टार सुपर स्पेशालिटी-भक्तीपूजानगर, लाईफ लाईन-भक्तीपूजानगर, कृष्णा हॉस्पिटल-संभाजीनगर, व्यंकटेश्‍वरा हॉस्पिटल-रविवार पेठ, केपीसी हॉस्पिटल-महाराणा प्रताप चौक, सुर्या हॉस्पिटल-दसरा चौक, अश्‍विनी हॉस्पिटल-संभाजी पूल, मेट्रो हॉस्पिटल-शाहुपुरी 2 री गल्ली (समन्वयक-सागर कांबळे- अधीक्षक) 
  • विन्स हॉस्पिटल-नागाळा पार्क, डायमंड हॉस्पिटल-नागाळा पार्क, अंतरंग हॉस्पिटल-नागाळा पार्क (समन्वयक-विलास साळोखे-अधीक्षक) 
  • अपेक्‍स हॉस्पिटल-शिवाजी पार्क, स्वस्तिक हॉस्पिटल-शिवाजी पार्क, सनराईज हॉस्पिटल-शिवाजी पार्क (समन्वयक-अशोक यादव) 
  • केळवकर हॉस्पिटल-ताराबाई पार्क, कोल्हापूर अथोपेडीक-न्यु शाहुपुरी, ऍपल सरस्वती-कदमवाडी, पल्स हॉस्पिटल-लिशा हॉटेल रोड (समन्वयक-संजय कुंभार,) 

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com