
कोल्हापूर : शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी काल आणि आज दोन दिवसांत शहरात केलेल्या कारवाईतून तब्बल दोन लाख दोन हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणे आणि एकेरी मार्गाचे उल्लंघन करण्याची कारवाई झाली. शहरात एकेरी मार्गावरून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, यातूनच महाद्वार रोडवर अपघात झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.