esakal | 800 लसींसाठी 4000 जणांनी मध्यरात्रीपासून लावल्या रांगा, आटपाडीतील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

800 लसींसाठी 4000 जणांनी मध्यरात्रीपासून लावल्या रांगा, आटपाडीतील प्रकार

800 लसींसाठी 4000 जणांनी मध्यरात्रीपासून लावल्या रांगा, आटपाडीतील प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आटपाडी : लसीकरणासाठी आटपाडी तालुक्याला (aatpadi tehsil) जिल्हा प्रशासनाकडून ८०० लशी मिळाल्या (covid-19 vaccine) आहेत. त्या घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर लोकांनी मध्यरात्रीपासून रांगा लावल्या आहेत. यामुळे सर्वच लसीकरण केंद्रांवर सोशल डिस्टन्सचा (social distance) फज्जा उडाला. सर्व लसीकरण केंद्रांसाठी ८०० लशी मिळालेल्या असताना जवळपास चार हजारांवर लोकांनी गर्दी केली होती.

जिल्ह्याला कोव्हिशिल्डच्या (covishield) १४ आणि कोव्हॅक्सिनच्या (covaxin) १२ हजार लसी आल्या होत्या. यातील आटपाडी तालुक्याच्या वाट्याला ८०० लशी मिळाल्या आहेत. त्याचे वितरण सकाळी ग्रामीण रुग्णालय आणि चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना (primary health center) केले. तेथून काही उपकेंद्रांना लशी देण्यात आल्या. जिल्ह्याला लस मिळाल्याची माहिती लोकांपर्यंत पोचली होती. त्यामुळे आटपाडी ग्रामीण रुग्णालय, आटपाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, दिघंची, करगणी आणि खरसुंडी आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठी गर्दी झाली होती.

हेही वाचा: इचलकरंजी IGM रुग्णालयातील हायफ्लो मशीनला आग

आटपाडी तर मध्यरात्री बारा वाजताच रांगा लावल्या होत्या. सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रावर पहाटेपासून लोकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी सात वाजता लसीकरण नोंदणीचे काम सुरू झाले. आटपाडी तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील नोंदणी स्थळापासून रस्त्यावर लांबपर्यंत लोकांची रांग लागली होती. तालुक्‍यातील सर्वच लसीकरण केंद्रावर शिस्त कोलमडून पडली होती. सोशल डिस्टन्स पुरता फज्जा उडाला होता.

लसीकरण कर्मचारी आणि लोकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक आणि लसीकरण कर्मचाऱ्यांना लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. लसीकरण केंद्रे कोरोनाचे प्रसार केंद्रे बनू नये, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अनेकजणांना पहिला डोस मिळून ५० ते ६० दिवस झालेत, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लस द्या, म्हणून आरोग्य विभागाकडे आग्रह धरला आहे. ज्यांना महिना झाला आहे आणि ४५ वर्षांच्या पुढील ज्यांना पहिला डोसही मिळाला नाही तेही लस मिळवण्यासाठी खटाटोप करीत आहेत.

हेही वाचा: बॉयफ्रेंडची पोलिसांकडे तक्रार करायला गेली अन् लग्न करूनच आली