prakash aawade
prakash aawadesakal

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प IGM मधून गांधीनगरात; आवाडेंचा आरोप

इचलकरंजी (कोल्हापूर) : कोरोनाची तिसरी लाट उद्भवण्याची शक्यता गृहीत धरुन जिल्हा नियोजनातून आयजीएम रुग्णालयात मंजूर झालेला 200 जंबो सिलिंडरचा एक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प गांधीनगर येथे हलविण्यात आला आहे, असा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. इचलकरंजीला कायम दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने पुढे आल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

आमदार आवाडे म्हणाले, येथील आयजीएम रुग्णालयात दररोज 400 जंबो सिलिंडर तयार करण्याचे ऑक्सीजन निर्मितीचे दोन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस त्यासाठी आवश्यक शेडची उभारणी करण्यात येत आहे. येत्या महिन्याभरात दोनपैकी एक प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. मात्र दुसरा प्रकल्प याठिकाणी मंजूर असतानाही गांधीनगर येथे हलविण्यात आला असल्याची माहिती आपणांस मिळाली आहे. हा प्रकल्प कोणत्या कारणास्तव हलविण्यात आला याची आपल्याला कल्पना नाही, त्यामागे कोणते राजकारण आहे याचा खुलासा होणे आवश्यक आहे.

Summary

इचलकरंजी मतदारसंघाला आरोग्य सुविधांबाबत नेहमीच दुय्यम दर्जा

इचलकरंजी मतदारसंघाला आरोग्य सुविधांबाबत नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो हे या घटनेवरुन पुन्हा सिध्द झाले आहे. याठिकाणी सध्या 6 हजार लिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प सुरु असून तसाच आणखीन एक प्रकल्प उभारण्यात असताना त्याचा अद्यापही थांगपत्ता दिसत नाही. तर केंद्राकडून तब्बल 21 हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प मंजूर झाला असून तो तातडीन उभारण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु असून तो लवकरच पूर्णत्वास नेला जाईल.

prakash aawade
राणे विरुद्ध शिवसेना; रमेश मोरेची हत्या का झाली?

त्या कर्मचा-यांचा प्रश्न लवकरच मार्गी

आयजीएम रुग्णालयाकडील 42 कर्मचार्‍यांच्या समावेशनाचा प्रश्‍न येत्या आठवडाभरात मार्गी लागेल. याबाबतचा आदेश राज्य शासनाकडून येऊन ते कर्मचारी सेवेत रुजू होतील, असे आमदार आवाडे यांनी सांगितले. त्याचबरोबर हे रुग्णालय केवळ कोविड रुग्णालय न ठेवता याठिकाणी अन्य आजारांवरील उपचार सुरु होणेबाबत पाठपुरावा सुरु असून 1 सप्टेंबरपासून तेथे सर्व उपचार सुरु होतील, असेही ते म्हणाले.

यंत्रमाग उद्योगासाठी रस्त्यावर उतरणार

मागील दहा वर्षापासून आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करीत असलेला वस्त्रोद्योग मागील दोन वर्षात कोरोना महामारी आणि महापूराच्या संकटाने मोडकळीस आला आहे. वस्त्रोद्योगाला उभारी मिळण्यासाठी शासनाने मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यासाठी नव्याने काहीही मागणे नसून जे राज्य शासनाने जाहीर केले आहे त्याची अंमलबजावणी करावी. अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष करावा लागले, असा इशारा आमदार आवाडे यांनी दिला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com