Panchganga Pollution: ‘एसटीपी’ उभारणीच्या दिरंगाईचा अहवाल द्या; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचे आदेश; कोल्हापुरात येऊन पाहणी करणार

Pankaja Munde Orders Report on STP Construction Delay: पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी एसटीपी उभारणीतील दिरंगाईचा विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
Panchganga Pollution

Panchganga Pollution

esakal

Updated on

कोल्हापूर: पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी.) उभारायचे आहेत. मात्र, या कामांना दिरंगाई होत आहे. हा उशीर का झाला, याचा विस्तृत अहवाल पाठवावा. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी नदीत न सोडता त्याचा पुनर्वापर करावा. मी प्रत्यक्ष कोल्हापुरात येऊन या कामांचा आढावा घेणार आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. आज त्यांनी पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या उपाययोजनांबाबत ऑनलाईन बैठक घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com