
आठ राज्य मार्ग, ३४ प्रमुख जिल्हा मार्ग, १४ जिल्हा मार्ग, ३० ग्रामीण भाग आदी मार्गांवरील वाहतूक बंद
कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर केर्लीजवळ रस्त्यावर पाणी
पाणी वाढल्यास कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद होण्याची शक्यता
करवीर तालुक्यातील १४ कुटुंबांचे स्थलांतर
मल्हार पेठेत घर कोसळून चौघे जखमी
जिल्ह्यात १३९ शाळा अतिवृष्टीमुळे बंद
सायंकाळी सातपर्यंत ७९ बंधारे पाण्याखाली
पाच सार्वजनिक, खासगी ७९२ मालमत्तेचे नुकसान
अतिवृष्टीमुळे ४० कुटुंबे तात्पुरती निराधार
शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा या डोंगरी तालुक्यांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस
Heavy Rains Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती बिकट होत आहे. पंचगंगा नदी धोका पातळीजवळ गेली आहे. पंचगंगेच्या पुराचे पाणी रात्री दहा वाजता कसबा बावडा ते शिये मार्गावर आले. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. शहरात सायंकाळनंतर पंचगंगेचे पाणी जामदार क्लबच्या पुढे आले होते. रात्री अकराच्या दरम्यान महामार्गावर शिरोली येथील सेवा रस्त्यावरही पुराचे पाणी आले आहे. दरम्यान, कुंभीच्या पुरात शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. शाहूवाडी तालुक्यातील काही वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला आहे.