
Kolhapur Weather Update : शहरात आज पावसाची उघडझाप, तर जिल्ह्यात दिवसभर संततधार सुरू राहिली. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी आठवड्यात दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. पाणी पातळी आज (ता.०२) सकाळी ३१ इंचांवर होती. यातच पावसाचा जोर वाढल्याने अद्यापही ३३ बंधारे पाण्याखाली असून, ३३ मार्ग बंद झाल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.