पंचगंगा आली इशारा पातळीपर्यंत; अणुस्कुरा घाटातून वाहतूक सुरळीत

जिल्ह्यात उघडझाप; काळम्मावाडी, तुळशी धरणातून विसर्ग कायम
water level of Panchganga river decreased by 3 feet at Kolhapur
water level of Panchganga river decreased by 3 feet at Kolhapur
Summary

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कालच बंद झाले असून, सध्या केवळ १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग विद्युत विमोचनात सुरू आहे.

कोल्हापूर: पंचगंगा नदीचे पाणी इशारा पातळीपर्यंत खाली आले असून, शहरासह जिल्ह्यात पावासाने उघडीप दिली आहे. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ७.१ मिमी. पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची रात्री आठची पाणी पातळी ४० फूट सहा इंचापर्यंत खाली आली असून, ३९ इशारा पातळी आहे. पूरग्रस्तांच्या स्थलांतराचे काम सुरू असून, शहरासह ग्रामीण भागात औषधपुरवठ्यासह स्‍वच्छता वेगाने सुरू आहे.

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कालच बंद झाले असून, सध्या केवळ १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग विद्युत विमोचनात सुरू आहे. जिल्ह्यातील पंधरापैकी सर्व धरणे ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरली असून, त्यांचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात एकूण २३ हजार ३६७ हजार कुटुंबे स्थलांतरित झाले असून, १ लाख ४ हजार ७२१ व्यक्तींचे स्थलांतर झाले आहे. पैकी १७ हजार ४९९ निवारा कक्षेत असून, उर्वरित नातेवाइकांकडे स्थलांतरित झाले आहेत. जिल्ह्यात ४११ गावे पूरबाधित झाली असून, पैकी ३४ पूर्णतः आणि ३७७ अंशतः बाधित झाले आहेत. जिल्ह्यात अंदाजे ४४२ कोटी ८४ लाख १० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती आतापर्यंत पुढे आली असून, अद्यापही पंचनामे सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

काळम्मावाडीतून विसर्ग सुरूच

राधानगरी : जलाशय पाणी पातळी स्थिर राहिल्याने तिसऱ्या दिवशीही काळम्मावाडी धरणातून विसर्ग कायम ठेवला आहे. धरणाचे पाचही वक्राकार दरवाजे अद्याप उघडलेले आहेत. त्यातून २६०० तर वीजनिर्मितीसाठी सोडलेले १००० असा एकूण ३६०० क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. चोवीस तासांत धरणक्षेत्रात २७ मिलिमीटर पाऊस झाला. धरण ८४ टक्के भरले आहे.

राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी सोडलेल्या १४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर ओसरल्याने आणि पातळीत हळू हळू घट सुरू आहे. २४ तासात धरण क्षेत्रात ५० मिलिमीटर पाऊस झाला.

तुळशीच्या पाणलोटात उघडीप

धामोड : तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप असून २४ तासांत ३१ मि.मी. पाऊस झाला. धरणाच्या तिनही दरवाजांतून १५२१ क्युसेक विसर्ग तुळशी नदीपात्रामध्ये सुरू आहे. तुळशी धरणक्षेत्रात आजअखेर ३२०९ मि.मी. पाऊस झाला. सध्या तुळशी धरणाची पातळी ६१५.४५मी. आहे. दरम्यान केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्पातून धरणात ६०० क्युसेक विसर्ग येत आहे.

water level of Panchganga river decreased by 3 feet at Kolhapur
महावितरणचे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापनार

२४ तासांत ७.१ मिमी. पाऊस

जिल्ह्यात आज सकाळी अकरा वाजता संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय पडलेला सरासरी पाऊस मिमी. मध्ये हातकणंगले ०.६ , शिरोळ- ०.२, पन्हाळा- ६.३, शाहूवाडी- ५.८, राधानगरी -१२.२, करवीर- २.५, कागल- २.३, गडहिंग्लज- २.३, भुदरगड- १०, आजरा-१०.७ व चंदगड- १०.१, गगनबावडा - उपलब्ध नाही

अणुस्कुरा घाटातून वाहतूक झाली सुरळीत

आंबा: अतिवृष्टीमध्ये दरडी कोसळल्याने राजापूर तालुक्याला घाटमाथ्याशी जोडणारा एकमेव शॉर्टकट मार्ग असलेला अणुस्कुरा घाट बंद झाला होता; मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्तव्यदक्ष अभियंता स्वप्नील बावधनकर आणि सहकाऱ्यांनी प्रतिकूल स्थितीमध्ये तातडीने दरडींची कोसळलेली माती हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

अणुस्कुरा घाटमार्ग कोकण आणि घाटमाथा यांना जोडणारा शॉर्टकट आहे. अतिवृष्टीमध्ये घाटामध्ये दरडी कोसळून मार्ग बंद झाला होता. त्यामुळे घाटमाथ्यावर जाण्याचा आणि तिकडून खाली येण्याचा वाहनचालकांना प्रश्‍न निर्माण झाला होता. अभियंता बावधनकर यांनी सहकाऱ्यांच्या साथीने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रतिकूल स्थितीमध्ये जेसीबीच्या साह्याने रस्ता मोकळा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com