esakal | महावितरणचे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापनार
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणचे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापनार

महावितरणचे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापनार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चिपळूण : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. ढगफुटी व अतिवृष्टीमुळे महावितरण व महापारेषणच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण तालुक्यात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत. या दौर्‍यात चिपळूण तालुक्यातील खेर्डी, वशिष्ठी नदीपूल परिसर तसेच मुरादपूर येथे सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी वीज कर्मचार्‍यांशी संवाद साधला.

प्रभावित क्षेत्रातील भागात दुरुस्तीसाठी त्वरित साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या. त्यांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करण्यात आले. या वेळी महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, उत्तम झालटे, अनिल कोलप, राजेश कोलप व शिल्पा कुंभार हे उपस्थित होते.

हेही वाचा: पूरग्रस्तांच्या वीज बिल प्रश्नाला बगल देत ऊर्जामंत्र्यांचा काढता पाय

ते म्हणाले, कोकणात वारंवार नैसर्गिक संकटे येत असल्यामुळे तेथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे कायमस्वरूपी तळ निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ व पुरामुळे वीज यंत्रणेचे खूप नुकसान झाले आहे. उघड्यावर वीज यंत्रणा असल्यामुळे प्रथम नैसर्गिक संकटाचा सामना ऊर्जा विभागाला करावा लागतो. यावर उपाययोजना व संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी आपत्ती विभाग कक्ष उपयुक्त ठरेल.

दरम्यान, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील १९४२ गावे व शहरातील ९ लाख ६० हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचार्‍यांनी भर पावसात व पुरात ७ लाख ५३ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक सुरू झाले आहे.

हेही वाचा: दिलासादायक; रत्नागिरीचा पॉझिटिव्हिटी दर घटला

कर्मचार्‍यांना उर्जामंत्र्यांकडून कौतुकाची थाप

अनेक भागात तारांसह खांब जमिनदोस्त झाले आहेत. या परिस्थितीत नदीला आलेल्या पुराचा सामना करत डोंगरदर्‍यांतून खांब, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या कर्मचार्‍यांनी वीज पुरवठा सुरळीत केला. त्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी कौतुक केले.

loading image
go to top