

collect plastic waste and debris
sakal
कोल्हापूर : पंचगंगा नदीघाटावरचा कचरा गोळा करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला ते ज्येष्ठ नागरिक आज एकत्र आले आणि बघताबघता कचऱ्याने विद्रुप झालेला घाट स्वच्छ झाला. प्लास्टिक पिशव्या, देवतांच्या प्रतिमांच्या फ्रेमस, कुजलेले नारळ गोळा करून ते पोत्यात भरण्यात आले. स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी सकाळी सात वाजण्यापूर्वीच स्वयंसेवक, कार्यकर्ते घाटावर आले होते.