जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचे नाव निश्चित झाले. याची कसलीही माहिती ग्रामस्थांना दिलेली नाही. शासकीय अधिकारी परस्पर निर्णय घेऊन तो स्थानिकांना मान्य असल्याचे भासवत आहेत.
पन्हाळा : येथील १३ डी लघुपटाच्या लोकार्पणावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येत्या मे महिन्यात पन्हाळगड जागतिक वारसास्थळांच्या (World Heritage Site) यादीत घेण्याचा अंतिम निर्णय घेत असल्याचे सांगितले; पण नागरिकांना विश्वासात न घेता शासकीय अधिकारी परस्पर पन्हाळ्याचे (Panhalgad) नाव जागतिक वारसा स्थळांच्या यादीत घेण्याचा निर्णय घेत असल्यामुळे पन्हाळावासीयांनी त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.