
पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावर प्रवासी कर नाक्याच्या दक्षिणेस पुरातन हरिहरेश्वर मंदिर, नागझरी, विठ्ठल मंदिर, पाराशर ॠषींची गुहा, काली बुरूज अशी ऐतिहासिक स्थळे आहेत. यापैकी बऱ्याच स्थळांची नोंद करवीर महात्म्यामध्ये आहे. हरिहरेश्वर, नागझरीच्या परिसरात एका खासगी व्यक्तीमार्फत उत्खनन सुरू असल्याने ही पौराणिक महात्म्य लाभलेली धार्मिक व ऐतिहासिक स्थळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर या परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.ळा