
Super Clean League Maharashtra : स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ च्या ‘सुपर स्वच्छ लीग’ विशेष श्रेणीत पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने यश मिळविले असून, विज्ञान भवन, दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते ऐतिहासिक पन्हाळा शहराचा गौरव करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी दिली. देशांतर्गत स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ चे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने सुपर स्वच्छ लीग श्रेणीत पुन्हा एकदा यश संपादन केले आहे.