
-मोहन मेस्त्री
कोल्हापूर : महापालिका शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेतून यश मिळवत आहेत. खरेतर तेथील शिक्षकांचे योगदान आणि शाळांमधील बदलते वातावरण हेच याचे कारण आहे. महापालिका शाळा म्हणजे कोंदट वातावरण, कपाटांची पार्टीशन करून वर्ग केलेली शाळा अशीच प्रतिमा अनेक पालकांच्या डोक्यात आहे. पण शाळा बंद पडणे म्हणजे शिक्षकांच्याही अस्तित्वाची लढाई झाली. त्यामुळे शिक्षकांनी पट वाढवण्याचे काम चॅलेंज म्हणून स्वीकारले. शाळांचे रूपच पालटले विद्यार्थ्यांना खासगी शाळेत आल्याचेही समाधान मिळवून दिले.