मुलांच्या हातात वाहन देणे पालकांना पडणार चांगलेच महागात

Parents  punished  accident is committed by a minor kolhapur news kids to drive, dhanaji surve
Parents punished accident is committed by a minor kolhapur news kids to drive, dhanaji surve

कोल्हापूर : अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यास देणाऱ्या पालकांवर आता कायदेशीर कारवाई होणार आहे. अशी प्रकरणे तुर्त परिवहन विभागाकडे येत आहेत. मात्र सुरवातीच्या टप्प्यात नव्या कायद्या विषयी जागृती घडविण्यावर भर दिला आहे. यापुढे मात्र लहान मुलांच्या हाती गाडी देणे तसेच अल्पवयीन मुलांकडून अपघात झाल्यास पालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

चालू महिन्यात राज्यभर रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. यात वाहतुकीच्या नियम व सुरक्षतेतेबाबत जागृती घडविण्यात येत आहेत. अशात बेफिकीरपणे लहान मुलांना गाडी चालविण्यास देणाऱ्यांना शिक्षा करण्याचा नवा कायदा नुकताच संमत झाला असून त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे. त्यानुसार अंमलबजावणीही सुरू झाली आहे. 

2020 मध्ये कोल्हापूर परिवहन विभागाकडे अल्पवयीन मुलांनी गाडी चालविल्याची जवळपास दहा प्रकरणे आली आहेत. त्या संबधीत पालकांना नोटीस दिल्या आहेत तरीही संबधीत पालकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी या गाड्या काळ्या यादीत टाकल्या आहेत. यापुढे ही संबधीतांचा शोधू घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे विभागाच्या सुत्रांनी सांगितले. 

बेशिस्त वाहन चालविल्यामुळे अलिकडे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते अपघातात देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. वाहतूक नियंत्रण आणि परिवहन विभागाकडून वेळोवेळी सूचना देऊनही वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने वेळोवेळी मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करून त्यात काही नवीन तरतुदी केल्या आहेत. मद्यपी चालक आणि अल्पवयीन वाहन चालकांना आळा घालण्यासाठीही नवीन नियम करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडल्यास मोठ्या प्रमाणावर दंड तसेच वाहन परवानाही रद्द करण्यात येणार आहेत. 

नव्या नियमानुसार वाहतूक नियम मोडणाऱ्याला कठोर शिक्षा होणार आहे. अल्पवयीन मुलांकडून अपघात झाला तर मोटार वाहन कायद्याच्या कलम 191 नुसार त्याचे पालक किंवा संबंधीत वाहन मालकाला दोषी ठरवून तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि 25 हजार रूपये दंड होऊ शकतो. शिवाय अल्पवयीन मुले चालवत असलेल्या वाहनाची नोंदणी रद्द होणार आहे. 

महाविद्यालयाच्या परिसरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकींचा सर्रास वापर होताना दिसत आहे. शिवाय दुचाकी चालवताना वेगावर नियंत्रण नसते. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. एका दुचाकीवर तिघेजण बसणे, स्टाईलमध्ये दुचाकी चालविणे यासह वाहतून नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तपणे दुचाकी चालविल्या जातात. 18 वर्षाखालील मुलाच्या हातात 50 सीसीच्या वरील चुचाकी देणे कायद्याने गुन्हा असूनही पालक आपल्या मुलांना बिनधास्तपणे दुचाकी देत असतात. परंतु, या मुलांना दुचाकी चालवताना काय काळजी घ्यावी याबाबत कोणतीच माहिती नसते. अलिकडे तर शाळा-कॉलेजला दुचाकी घेऊन जाण्याचे फ्याडच आले आहे. दहावी पास झाला की मुलाला दुचाकी घेऊन देण्याची पध्दतच जणू अलिकडे रूढ होताना दिसत आहे. परंतु, या फ्याडमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. मुलांमध्ये वाहतुकीबाबत जनजागृती होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण देणे गरजेचे आहे. शाळेतच ही मुले सज्ञान झाली तर पालक ही सज्ञान होतील आणि अपघाताचे प्रमाण कमी होईल, यासाठी परिवहन विभाग जगजागृती करत आहे.  


नव्या नियमानुसार काय होणार?
अल्पवयीन मुलाकडून अपघात झाला तर पालक किंवा संबंधित वाहनमालकाला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व २५ हजार रुपये दंड होऊ शकतो.अल्पवयीन मुले चालवत असलेल्या वाहनाची नोंदणी रद्द.

अल्पवयीन मुलांना वाहन चालविताना कोणती काळजी घ्यायची, याविषयी जास्त माहिती नसते. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांच्या हातात वाहन देऊ नये. याबाबत पालकांनीच लहान मुलांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. जर लहान मुलांच्या हातात गाडी दिली तर संबंधित वाहनमालकासह मुलाच्या पालकावरही कारवाई होईल. त्यामुळे पालकांनीच याबाबत काळजी घ्यावी. 
-स्टीव्हन अल्वारिस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

संपादन- अर्चना बनगे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com