
सरकारी शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता घसरल्याने विद्यार्थ्यांची संख्याही घटत चालली असताना कोल्हापुरामधून एक सुखद बातमी समोर आली आहे. महानगरपालिकेच्या जरगनगर येथील शाळेत गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुलाचे नाव शाळेत नोंदविण्यासाठी पालकांनी प्रवेशासाठी शनिवारी पहाटे पासूनच गर्दी केली आहे. इयत्ता पहिलीचे मर्यादित प्रवेश आणि पालकांची मोठी गर्दी यामुळे शाळा व्यवस्थापनसमोर कोणाकोणाला प्रवेश द्यायचा हा मोठा प्रश्न पडला आहे.