
कोल्हापूर : एसटी महामंडळाच्या बसमधून दीर्घपल्ल्याचा प्रवास करताना स्वच्छतागृह तसेच हॉटेलमधील गैरसोयीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे ते कोल्हापूर मार्गावर एसटी प्रवास सुरू झाल्यानंतर अवघ्या एक तासाच्या अंतरावर कापूरवाळगावजवळ एका खासगी हॉटेलवर महामंडळाने थांबा दिला आहे. येथील स्वच्छतागृहाचा मनस्ताप प्रवाशांना नेहमी सोसावा लागतो, अशी अनेक उदाहरणे रोजची आहेत. याबाबत तक्रारी करून काहीच उपयोग होत नसल्याने प्रवासी वर्ग जेरीस आला आहे.