सरपंच कोळी यांनी निवडणूक होऊन दोन वर्षे झाली तरीही जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांना सरपंचपदावरून अपात्र ठरवावे, अशी तक्रार रायगोंडा डावरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
पट्टणकोडोली : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या (Pattankodoli Gram Panchayat) लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री दत्तात्रय कोळी (Sarpanch Bhagyashree Koli) यांनी अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र (Scheduled Tribe Caste Certificate) मुदतीत सादर न केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी त्यांना अपात्र घोषित केले. रायगोंडा डावरे यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये या विरोधात याचिका दाखल केली होती.