कोल्हापूर : पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती (Pavitra Portal Teacher Recruitment) प्रक्रिया २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शाळांतील रिक्त पदांच्या आधारे होत आहे. मात्र, शिक्षण विभागाने (Education Department) नुकतीच संचमान्यता ऑनलाईन उपलब्ध करून दिली. त्यामध्ये खासगी अनुदानित शाळांमधील अनेक पदे कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भरतीचा दुसरा टप्पा रखडणार आहे.