ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान येाजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येत आहेत.
कोल्हापूर : संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) व श्रावणबाळ योजनेतील (Shravanbal Yojana) ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन आता ‘डीबीटी’द्वारे थेट बँक खात्यावर जमा होणार आहे. यासाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्डचे बँक खात्याशी ‘केवायसी’ असणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९२ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे; परंतु ज्यांचे बँक खात्याशी ‘केवायसी’ झालेले नाही, त्यांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांची अडचण होणार आहे.